सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन

सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन हि सिन्नर तालुक्यात शेती विषयक सामाजिक कार्यात सक्रिय असलेली संस्था आहे . या संस्था अंतर्गत तालुका पातळीवर विविध उपक्रम राबविले जातात. सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन अंतर्गत हि संस्था कार्यरत आहे . संस्थेचे आजमितीस ३०० सभासद आहेत. संस्थे तर्फे कृषि विक्रेत्याचे हिताचे रक्षण करण्याबरोबरच शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबविल्या जातात. कृषी विक्रेत्यांसाठी थकबाकीदार व संबंधित विषयांसाठी उपयुक्त अशी वेबसाइट संस्थेतर्फे लोकार्पण करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संचालक मंडळातील सभासदांना संपर्क साधा.

आमची उत्पादने

कांद्या उत्पादन

टोमॅटो उत्पादन

डाळिंबाचे उत्पादन

संस्थापक अध्यक्षांचे मनोगत

    नमस्कार
    सिन्नर तालुक्यातील सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन अर्थात 'साडा' च्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सभासदांचे मी आपल्या युनियनचा "संस्थापक अध्यक्ष" या नात्याने मनापासून स्वागत करतो.
    मित्रांनो,
    खरेतर आपल्या युनियनच्या अर्थात असोशिएशनच्या वेबसाईट मध्ये आपण सिन्नर तालुक्यातील तसेच परीवारातील मुख्य पिके, आपल्या युनियनमार्फत सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि काही विशिष्ठ थकीत ग्राहकांबद्दल माहिती आणि इतर काही मुद्यांचा समावेश करत आहोत. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतांना सांगतात कि, 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीप्रमाणे संघटना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे आपले कर्म करत आहे.

संचालक मंडळ

श्री. दीपक मधुकर सानप

अध्यक्ष

श्री. गुरुनाथ विठ्ठल पवार

उपाध्यक्ष

श्री. नवनाथ काशिनाथ खताळे

खजिनदार

श्री. सुदाम केरु खताळे

सरचिटणीस

आम्हाला संपर्क करा

  • गाळा नं. ९, बाजार समिती संकुल, सिन्नर, जि. नाशिक
  • sanapdeep@gmail.com
  • 7507409840