संस्थापक अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार,

सिन्नर तालुक्यातील 'सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन' अर्थात 'साडा' च्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सभासदांचे मी आपल्या युनियनचा "संस्थापक अध्यक्ष" या नात्याने मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो,

खरेतर आपल्या युनियनच्या अर्थात असोशिएशनच्या वेबसाईट मध्ये आपण सिन्नर तालुक्यातील तसेच परीवारातील मुख्य पिके, आपल्या युनियनमार्फत सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि काही विशिष्ठ थकीत ग्राहकांबद्दल माहिती आणि इतर काही मुद्यांचा समावेश करत आहोत.

ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतांना सांगतात कि, 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीप्रमाणे संघटना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे आपले कर्म करत आहे.

आज आणि भविष्यात सुद्धा, कुठलाही व्यवसाय करणे खूपच कठिण होत चालले आहे. त्यामुळे आपण मनापासून एकत्रित येऊन, संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. तसेच एकमेकांविषयी कुठलिहि चुकीची भावना न ठेवता सर्वांच्या कल्याणासाठी काम करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

तसे बघितले तर आपला सिन्नर तालुका हा नेहेमीच दुष्काळाच्या छायेत असतो. परंतु मला अभिमानाने सांगावेसे वाटते कि आपल्या तालुक्यातील शेतकरी हा खूप काबाडकष्ट करणारा आहे. नव-नवे तंत्रज्ञान वापरून नाशिक जिल्हयात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कांदा या आणि अशा भरपूर पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याचे काम फक्त आणि फक्त सिन्नर तालुकाच करू शकतो आणि यामध्ये मोलाचे तसेच अनमोल असे सहकार्य आपण सर्व कृषी विक्रेते शेतकऱ्यांना करत असतो.

आपण कृषी व्यावसायिक या नात्याने शेतकर्यांना अहोरात्र सेवा देत असतो. शेतकर्यांना पिकांबाबत, त्याच्या वाणाबाबत, रोगांबाबत आणि भरघोस असे उत्पन्न काढण्यासाठी, जे जे काही करता येईल, ते ते आपण सर्वजण करत असतो आणि हे सर्व करत असताना आपल्याला खूप मोठ्या भांडवलाची नेहेमीच गरज असते आणि त्यामुळे आपण बँकांकडून नातेवाईकाकडून पैसे उसने घेणे, खाजगी लोकांकडून व्याजाने पैसे घेणे, कधीकधी आपली मालमत्ता, शेती गहाण ठेवून भांडवलाची तजवीज करत असतो.

ज्यावेळी आपला ग्राहक अडचणीत असतो, त्यावेळी आपण कुठलाही विचार न करता मनमोकळेपणाने त्याला आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत करतो, परंतु काही कालावधीनंतर मात्र हेच ग्राहक आपली फसवणूक करतात, आपले हक्काचे, घामाचे पैसे थकवतात किंवा बुडवतात. त्यामुळे निश्चितच आपल्यावर पश्चातापाची वेळ येते, कारण आपण कोणतेहि कारण न देता त्याला मदत केलेली असते. परंतु आता ग्राहकांकडे 'कधिहि न संपणारे, मोजता न येणारे, असे अगणित कारणे असतात.

मित्रांनो, त्यामुळेच आता वेळीच काहि गोष्टींची काळजी घेणे आणि एकत्र येणे, हि काळाची गरज आहे.

त्यामुळेच आपण या वेबसाईटच्या माध्यमांतून यावर एक प्रयोग करत आहोत. हा प्रयोग यशस्वी करणे न करणे, हे सर्वस्वी आपल्या सर्वांच्या हातात आहे. कारण हे यशस्वी झाले तर फायदा आपला आणि नाही झाले तर तोटा पण आपलाच. त्यामुळे आपण ठरवायचे आहे कि, नेमके काय करायचे?

बंधुनो,

परत एकदा मी आपल्या 'साडा' या युनियनच्या सर्व सभासदाचे अंतरमनापासून स्वागत करतो.

येणाऱ्या काळात ज्या काहि अडचणी येतील त्या आपण सर्वजण मिळून दूर करु, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यात आपली संघटना राज्यातील नव्हे तर देशातील आदर्शवत संघटना म्हणून नावारुपाला येऊ दे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

धन्यवाद,

आपलाच, श्री. दिपकसेठ सानप

संस्थापक अध्यक्ष (साडा) सिन्नर अ‍ॅग्रो डिलर असोसिएशन

श्री. दीपक मधुकर सानप

संस्थापक अध्यक्ष

आजपर्यंत युनियननी / संघटनेनी केलेली कार्य

  • सर्वप्रथम आपल्या सिन्नर च्या संघटनेने Registration करून, एक अधिकृत संघटना म्हणुन शासन दरबारी नोंद केली .
  • संघटनेच्या कामासाठी नविन कार्यालय / ऑफीस घेऊन त्यांचे परवाना संबंधीची सर्व कामे Online करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.
  • Online च्या कामासंदर्भात गरजेचे कॉम्प्युटर आणि प्रिन्टर विकत घेतले.
  • यापूर्वी संघटनेच्या नावाने बँकेत कधीही खाते नव्हते, परंतु आता सर्व व्यवहार हे पूर्णपणे अधिकृत खात्यामार्फत केले जातात.
  • संघटनेच्या कामासाठी आर्थिक नियोजनाची खुप गरज असते, त्यामुळे गावोगावी फिरून तालुक्यातील सर्व सदस्या कडून संघासाठी फंड जमा केला.
  • खाते बियाणे व कीटकनाशके यांची साठा बुक, ऑफिस मध्ये उपलब्ध करून दिली.
  • आपल्या संघटनेचे ऑडिटचे काम करण्यासाठी व्यवस्थापकाची नेमणुक केली.
  • सभासदांची संख्या वाढली.
  • आजपर्यंतच्या हिशोब व्यवस्थित ठेवला.
  • तालुक्यात नविन संचालक बनवले .

युनियन म्हणजे काय ? / युनियन चे महत्त्व.

  • युनियन / संघटना म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन एका ध्येयासाठी संघटन करणे.
  • युनियन आपल्या सभासदांच्या कल्याणासाठी काम करत असते .
  • संघटना किंवा युनियन हि एक प्रकारची संवादाचे माध्यम म्हणून सुद्धा काम करत असते. संघटनेमार्फत दिलेली निवेदने, अर्ज याचा विचार नक्कीच शासनाला करावा लागतो.
  • संघटनेतील लोकांवर होणारा अन्याय थांबवण्याचे काम संघटना करत असते . त्यासाठी बेमुदत बंद, उपोषणे संप यासारख्या आयुधांचा वापर संघटना करत असते.
  • शासनामार्फत येणारे GR, नियमावाली संघटनेमार्फत सर्व सभासदांना कळविले जाते.

आमची उत्पादने

कांद्या उत्पादन

टोमॅटो उत्पादन

डाळिंबाचे उत्पादन

द्राक्षे उत्पादन